Ad will apear here
Next
वीर सेवा दलातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
प्रातिनिधिक फोटोकोरोची (कोल्हापूर) :  स्वातंत्र्यदिन आणि वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोरोची येथील वीर सेवा दल आणि जयसिंगपूर येथील ‘पायोस हॉस्पिटल’ यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर कस्तुरबा गांधी बालवाडी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत होणार आहे. या शिबिरात गरजू रुग्णांना इसीजी सुविधा, ‘पायोस हॉस्पिटल’ मध्ये लॅब व एक्सरे चाचणीसाठी २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचाही लाभ रुग्णांना घेता येणार आहे.

जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीर सेवा दलाचे जिल्हा सचिव विजय बरगाले, संघनायक स्वप्नील उपाध्ये, उपसंघनायक सौरभ पाटील यांनी केले आहे.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर
दिवस : १५ ऑगस्ट
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ४
स्थळ : कस्तुरबा गांधी बालवाडी, कोरोची

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZOUBF
Similar Posts
वीर सेवा दलातर्फे पुरातन मंदिरांची स्वच्छता कोरोची : वीर सेवा दल प्रांतीय जिल्हा व तालुका समितीच्यावतीने पुरातन मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानांतर्गत भोगोली, इब्राहीमपूर, स्तवनिधी, बांबवडे (धर्मगिरी) टाकवे येथील जैन मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ७० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
‘युवतींनी स्वत:तील क्षमता सिद्ध करावी’ कोरोची : ‘युवतींनी वाईट गोष्टींपासून परावृत्त होऊन आपल्या करियरकडे जास्त लक्ष द्यावे, आपल्यातील क्षमता सिद्ध केल्यास जग आपोआप तुमच्याकडे वळेल’, असे मत सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी दिला. आळते येथील युवती सक्षमीकरण शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन सुकुमार पाटील होते
वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेतर्फे वृक्षारोपण कोरोची (कोल्हापूर) : वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेच्या वतीने कोरोची येथील शांतिसागर मैदान व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारची ५० रोपे या वेळी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. वृक्षारोपणासाठी कोरोची ग्रामपंचायतीचे सरपंच सर्जेराव माने, वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीचे क्रीडा
वीर सेवा दलातर्फे कोरोची येथे दुग्धव्यवसाय प्रशिक्षण शिबिर कोल्हापूर : येथील वीर सेवा दल जिल्हा व तालुका समिती आणि वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेतर्फे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत दुग्धव्यवसाय प्रशिक्षण शिबिर कोरोची येथील कस्तुरबा गांधी बालवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी पाच ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करायची आहे. जिल्हा प्रमुख अजित पाटील व जिल्हा सचिव विजय बरगाले यांनी ही माहिती दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language